Surprise Me!

Freshers Season 2 | 'फ्रेशर्स'चं सिझन 2 भेटीला येणार? Lokmat Filmy

2021-08-24 1 Dailymotion

२०१६ साली झी युवा वाहिनीवर ‘फ्रेशर्स’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ही मालिका त्यावेळी तरुणांमध्ये प्रचंड गाजली. यातील मनवा, परी, रेणुका, सायली, नीरव, सम्राट, धवल ही पात्र सर्वांना आपलीशी वाटू लागली होती. नुकतच या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेले अभिनेत्री रश्मी अनपट, अमृता देशमुख, रसिका वेंगुर्लेकर, मिताली मयेकर, अभिनेता सिध्दार्थ खिरीड, ओंकार राउत हे सर्व पुन्हा एकत्र आलेत. नुकतेच मितालीने तिच्या सोशल मीडियावर या सर्वांचा एक व्हिडिओ शेअर केलाय. यावरूनच या सर्वांचे Réunion झाल्याचे कळून येते. या व्हिडिओमध्ये हे सगळे लहान मुलांसारखे डान्स करताना दिसत आहेत. मितालीने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलयं की, ' तुम्हाला जे दिसतयं तस अजिबात नाहीये. आम्ही फक्त आमच्यातील लहान मुलाला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत.' अस लिहीत तिने पुढे ओंकारला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावर अनेकांनी कमेंट करत ‘फ्रेशर्स २’ कधी येणार असे प्रश्न विचारले आहेत.
Snehalv0
#FreshersSeason2 #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon